अल्पसंख्याक विद्यार्थींनी साठी वसतिगृह

अल्पसंख्याक उच्च शिक्षण विद्यार्थींनी साठी वसतिगृह

राज्यातील अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये वसतिगृह बांधण्यास दिनांक ०२.०३.२०१० च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. शासन निर्णय दिनांक २१.०६.२०१३ अन्वये विद्यापीठाच्या आवारात बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहांव्यतिरिक्त अन्य वसतिगृहांचे कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. या वसतिगृहांमध्ये ७०% जागा अल्पसंख्यांक समाजातील मुलींसाठी राखीव असतात. उर्वरित ३०% जागा अन्य प्रवर्गातील मुली मधून भरण्यात येतात. प्रवेशासाठी अल्पसंख्याक मुलींचे अर्ज पुरेशा प्रमाणात प्राप्त न झाल्यास बिगर अल्पसंख्याक समाजातील मुलींना त्या जागांवर प्रवेश देण्यात येतो. सदर वसतिगृहे शासकीय शैक्षणिक संस्थेच्या तसेच विद्यापीठाच्या आवारात बांधण्यात येतात

योजनाविषयीचा शासन निर्णय