वैद्यकीय व अर्धवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तीसाठी संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय इमारत चौथा मजला, सेंट जॉर्जस रुग्णालय आवार, मुंबई - ४०० ००१ आणि तांत्रिक व व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तीसाठी संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय ३ महानगरपालिका मार्ग , मुंबई-४०० ००१ यांचेकडे संपर्क साधावा. तसेच इयत्ता बारावी नंतरच्या इतर उच्च शिक्षणातील अभ्यासक्रम, उदा. कला, विज्ञान आणि वाणिज्य तसेच कृषी, विधी व इतर कला शाखांतील अभ्यासक्रमाच्या संदर्भात संचालक (उच्च शिक्षण) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे संपर्क साधावा.