वैयक्तिक अल्पसंख्याक प्रमाणपत्राबाबत – महाराष्ट्र शासनाकडून कोणत्याही व्यक्तीस धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत नाही. अल्पसंख्याकाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याच्या दाखल्यामधील नोंद ग्राह्य धरण्यात येते. जर अशा प्रकारची नोंद शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये नसेल तर धर्म / भाषा याबाबतचे स्वयंघोषित शपथपत्र (Notarized Affidavit) अल्पसंख्याक असल्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. याबाबत शासन निर्णय क्र.-अविवि-2010/प्र.क्र.109/10/काया-5 दि. 01 जुलै 2013 पहावा.
शासन निर्णयासाठी इथे क्लिक करा