११ वी पंचवार्षिक योजना

बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रम(MsDP)
कालावधी - 11 वी पंचवार्षिक योजना ( 2008-12 )

बहु-क्षेत्रीय विकास कार्यक्रम हा केंद्र पुरस्कृत क्षेत्र विकास कार्यक्रम आहे. या अंतर्गत अल्पसंख्याक बहुल क्षेत्रामध्ये सामाजिक - आर्थिक पायाभूत सुविधा निर्माण करून अल्पसंख्याक समुदयाच्या जिवनाच्या गुणवत्ते मध्ये वाढ करण्यासाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाऊन अल्पसंख्याक क्षेत्रातील विकासातील असमतोल कमी केला जातो.

जनगणना 1971 च्या आकडेवारीच्या आधारे ज्या जिल्ह्यात अल्पसंख्याकांची लोकसंख्या २० टक्के किंवा त्याहून अधिक आहे. या एका निकषावर आधारित अल्पसंख्यक बहुल 41 जिल्ह्यांची यादी 1987 मध्ये या जिल्ह्यांतील सरकारी कार्यक्रम आणि योजनांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी तयार करण्यात आली.

बहु-क्षेत्रीय विकास कार्यक्रम (MsDP) हा सच्चर समितीच्या शिफारशींवरील पाठपुरावठा कृतीचा एक विशेष उपक्रम मानला गेला. हा कार्यक्रम 11 व्या पंचवार्षिक योजनेच्या सुरूवातीस केंद्र सरकारद्वारे मंजूर केलेला केंद्र पुरस्कृत कार्यक्रम आहे

11 व्या पंचवार्षिक योजनेत केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने लोकसंख्या, सामाजिक व आर्थिक स्थिती आणि मूलभूत सुविधांची उपलब्धता या मानकांच्या आधारे देशातील ९० जिल्हे मागासलेले अल्पसंख्याक बहुल जिल्हे म्हणून निश्चित केले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील खालील चार अल्पसंख्याक बहुल जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे :-

  • 1. परभणी
  • 2. बुलढाणा
  • 3. वाशीम
  • 4. हिंगोली

 

11 व्या पंचवार्षिक योजनेत केंद्र पुरस्कृत बहु क्षेत्रीय विकास कार्यक्रमांतर्गत (MsDP) महाराष्ट्रातील परभणी, बुलढाणा, वाशीम, हिंगोली या 04 अल्पसंख्याक बहुल जिल्हयांमध्ये,

  • घरकुल योजना
  • अंगणवाडी केंद्र आणि
  • अल्पसंख्याक मुलींसाठी ६० व १०० प्रवेशक्षमतेची वसतिगृह बांधकाम,

 

12 व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत एकूण रू. 122.50 कोटी किंमतीचे एकूण 12302 कामे मंजूर करण्यात आली होती त्यापैकी 11725 कामे पूर्ण झाली असून , 577 कामे विविध कारणांमुळे रद्द करण्यात आली आहेत.

या योजना राबविण्यात येत आहेत. दि. ३१.१1.२०20 अखेर योजनेअंतर्गत जिल्हनिहाय निर्धारित उद्दिष्ट, उद्दिष्ट पूर्तता इ. बाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

 

प्रकल्पांच्या परिपूर्ण माहितीसाठी इथे क्लिक करा डाटाबेस -

District Project Type Target Completed Cancelled
Parbhani Indira Awas Yojana 2200 2200 0
Anganwadi Center 215 197 18
Hostel 2 2 0
         
Buldhana Indira Awas Yojana 3000 2959 41
Anganwadi Center 237 218 19
Hostel 0 0 0
         
Hingoli Indira Awas Yojana 3730 3537 193
Anganwadi Center 42 38 4
Hostel 2 2 0
         
Washim Indira Awas Yojana 2740 2473 267
Anganwadi Center 132 97 35
Hostel 2 2 0
         
Total Indira Awas Yojana 11670 11169 501
Anganwadi Center 626 550 76
Hostel 6 6 0
    12302 11725 577