वक्फ (सुधारणा) अधिधियम २०१३ (२०१३ चे २७ वे) च्या कलम ८३ च्या पोट कलम (४) मधील सुधारित तरतुदीनुसार तसेच, मा.मुंबई उच्च नन्यायालयाने तयांच्या उपरोक्त दि.१६ जानेवारी, २०१६ च्या पत्रान्वये प्रदान केलेल्या सहमतीस अनुसरून, दि.वक्फ २०१५/प्र.क्र.१४२/का.४, १ ऑगस्ट, २०१७ च्या शासन अधिसूचनेअन्वये, त्रि-सदस्यीय महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद ची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर न्यायाधिकरणासाठी २० पदे निर्माण करण्यात आली आहेत.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने पारित केलेल्या आदेशाविरुद्ध वक्फ न्यायाधिकरणात अपिल दाखल करण्याचा, वक्फ अधिधियम, १९९५ मधील कलम ८३(२) येथील तरतुदीनुसार, संबंधित पक्षाला अधिकार आहे.
महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणावर खालीलप्रमाणे सदस्य नियुक्ती करण्यात आले आहेत.
१) श्री. मोहम्मद तन्वीर इकबाल अहमद असिम , अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधिश-१ तथा आधिरिक्त सत्र न्यायाधिश
२) ॲड.मुहम्मद इक्बाल हुसेन, “सदस्य, मुस्लिम कायद्याचे ज्ञान असणारी व्यक्ती”
महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबादचा पत्ता खालीलप्रमाणे आहे -
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद
जबिंदा एव्हेन्यू, जिल्हा व सत्र न्यायालयासमोर, अदालत रोड, औरंगाबाद ४३१ ००५.
दुरध्वनी क्र. : (०२४०) २३२६५५८
ईमेल : pomhwtaurangabad@gmail.com