केंद्र शासनाच्या 15 कलमी कार्यक्रमांतर्गत दिलेल्या सूचनांनुसार अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना स्पर्धात्मक परिक्षेमध्ये समान संधी मिळण्यासाठी व राज्यातील पोलीस सेवेमधील प्रमाण वाढविण्यासाठी शासन निर्णय क्र. अविवि-2009/ प्र.क्र.188/ 09/का.1, दि. 27.07.2009 अन्वये महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत सन 2009-10 या वर्षापासून ही योजना राबविण्यात येत आहे.