भारत सरकारने वक्फ अधिनियम, १९९५ हा कायदा पारीत करुन संपूर्ण देशात लागू केला. सदर कायदा महाराष्ट्र राज्यात दि.०१/०१/१९९६ पासून लागू करण्यात आलेला असून या कायद्यातील तरतुदींनुसार शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्र.वक्फ-१०/२००१/प्र.क्र.१५४/ल-३, दि.४ जानेवारी, २००२ अन्वये पनचक्की, औरंगाबाद येथे मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील वक्फांची संख्या सुमारे २७,००० इतकी असून या सर्व वक्फांची मिळून एकूण सुमारे १,००,००० एकर इतकी जमीन आहे. यापैकी सुमारे ७० टक्के वक्फ जमिनी अतिक्रमणाखाली आहेत. सुमारे ११५ भूखंडावर शासकीय/निमशासकीय वा स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्यालय असल्याचा वक्फ मंडळाचा अहवाल आहे. स्थानिक वक्फ मालमत्तेचे संरक्षण करणे, विकास करणे तसेच हजारो वक्फ संस्थांच्या व्यवस्थापन समित्यांचे तंटे सोडविणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, इ. कामे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या प्रशासकीय व्यवस्थापनेकडे सोपविण्यात आलेली आहे.
२. वक्फ अधिनियम, १९९५ च्या कलम १४ अन्वये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर सदस्य नियुक्ती करण्याकरिता तरतुदी विहित करण्यात आलेल्या आहेत. सद्य:स्थितीत महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर एकूण 10 सदस्य कार्यरत असून या सदस्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे -
अ . क्र .
|
निर्वाचक गण
|
वक्फ अधिनियम, १९९५ मधील कलम व नेमणुकीचा प्रकार
|
नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांचे नाव
|
नियुक्तीच्या अधिसूचनेचा क्रमांक व दिनांक
|
१
|
सहसचिव पदापेक्षा कमी नाही असे पद धारण करणारा राज्य शासनाचा अधिकारी
|
कलम १४(१)(इ)
नामनिर्देशनाने १
|
- श्री.इ.मु. काझी, सह सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग
|
वक्फ 2016/ प्र.क्र.248/ का.4
दि.18 मे, 2017
|
२
|
राज्य बार कौन्सिलचे मुस्लिम सदस्य.
|
कलम14(1)(ब) (तीन);
निवडणूक प्रक्रियेने १ वा २
|
- ॲड.श्री.खालीद बाबू कुरेशी
|
वक्फ 2017/ प्र.क्र.82/ का.4,
दि.19 सप्टेंबर, 2017
|
- ॲड.अहेमदखान, उस्मानखान पठाण
|
वक्फ 2020/ प्र.क्र.105/ का.4,
दि.10 सप्टेंबर, 2021
|
३
|
रु.१ लाख किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या वक्फ संस्थांचे मुतवल्ली
|
कलम १४(१)(ब)(चार)
निवडणूक प्रक्रियेने १ वा २
|
- डॉ.मुद्दसीर लांबे
|
वक्फ 2018/ प्र.क्र.122/ का.4,
दि.13 सप्टेंबर,2019
|
४
|
राज्यातील मुस्लिम संसद सदस्य
|
कलम १४(१)(ब)(एक)
निवडणूक प्रक्रियेने १ वा २
|
- मा.खा.श्रीम.डॉ. फौजिया तहसिन अहमद खान, राज्य सभा सदस्य
- मा.खा.श्री.सय्यद इम्तियाज जलील, लोक सभा सदस्य
|
वक्फ 2020/प्र.क्र.10 (भाग-१)/ का.4,
दि.05.फेब्रुवारी, 2021
|
५
|
राज्य विधान मंडळाचे मुस्लिम सदस्य
|
कलम १४(१)(ब)(दोन)
निवडणूक प्रक्रियेने १ वा २
|
- डॉ वजाहत मिर्झा अथर मिर्झा, विधानपरिषद सदस्य
|
वक्फ 2020/प्र.क्र.10 / का.4,
दि.15 एप्रिल, 2021
|
६
|
नगर रचना किंवा व्यवसाय व्यवस्थापन, सामाजिक कार्य, वित्तीय किंवा महसूल, कृषि आणि विकास कार्य या मध्ये व्यवसायिक अनुभव असलेली व्यक्ती.
|
कलम14(1)(क);
नामनिर्देशनाने १
|
- श्री.समीर गुलामनबी काझी
|
वक्फ 2021/प्र.क्र.12 / का.4,
दि.26 ऑगस्ट, 2021
|
७
|
शिया व सुन्नी इस्लामी ईश्वरशास्त्रातील प्रत्येकी एक, मान्यता प्राप्त विद्याव्यासंगी
|
कलम14(1)(ड);
नामनिर्देशनाने २
|
- श्री.शेख हसनैन शाकीर
- मौलाना हाफीज सय्यद अतहर अली
|
वक्फ 2021/प्र.क्र.21 / का.4,
दि.9 सप्टेंबर, 2021
|
|
एकूण
|
|
१० सदस्य
|
|
३. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी रु.१५ कोटी अनुदान देण्याचे शासनाने मान्य केले असून त्यानुसार सन २०११-१२ महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळास आतापर्यंत रु.9.45 कोटी इतकी रक्कम वक्फ मंडळाला वितरित करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात (सन 2021-22) या उद्दिष्टाकरिता रु.15.00 कोटी इतकी अर्थसंकल्पिय तरतूद करण्यांत आलेली आहे.
४. सन्माननीय मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या दि.21/09/2011 च्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद ची स्थापना करण्याविषयीची दि.04/01/2002 ची अधिसूचना तसेच महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद ची दि.13/11/2003 च्या अधिसूचनेअन्वये प्रसिध्द करण्यात आलेली महाराष्ट्र राज्यातील वक्फांची यादी रद्द (Set-aside) केली आहे. मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या सदर दि.21/09/2011 च्या आदेशाविरुध्द शासनाच्या व वक्फ मंडळाच्या वतीने सन्माननीय सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्र.३२१२९-३२१३१ दाखल करण्यात आलेल्या असून मा.सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या दि.२९/११/२०११ रोजी दिलेल्या आदेशान्वये, मा. मुंबई उच्च न्यायालयाने स्वत:च्या आदेशास दि.२१/०९/२०११ रोजी दिलेली स्थगिती कायम केली आहे. सद्य:स्थितीत सदरचे प्रकरण मा.सर्वोच्च न्यायालयापुढे न्यायप्रविष्ट आहे.
५. श्री.अनिस शेख यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ या पदावर दि.19.03.2021 पासून नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ कार्यालयाचा कार्यालयीन पत्ता खालीलप्रमाणे आहे-
श्री.अनिस शेख
मुख्य कार्यकारी अधिकारी,
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, पनचक्की, औरंगाबाद,
दुरध्वनी क्र. : (०२४०) २४०२३६६ /२४०१५८४
ईमेल : ceomsbw@gmail.com
संकेतस्थळ : www.mahawakf.com