राज्य शासनाने हज यात्रेस जाणाऱ्या यात्रेकरुंच्या सोयीसाठी राज्य पातळीवरील हज समिती स्थापन करण्याचा दि. २९. १२. १९८९ रोजी निर्णय घेवून दि. २९ .०१ .१९९० रोजी राज्य हज समितीची स्थापना केली आहे.
हज समिती अधिनियम, २००२ च्या नियम १८(१) अनुसार राज्य हज समितीची रचना खालीलप्रमाणे आहे:-
- ३ सदस्य : (अ) राज्याचे प्रतिनिधीत्व करणारे संसद सदस्य,
(ब) राज्य विधान सभा सदस्य, आणि
(क) विधान परिषद सदस्य
- ३ सदस्य : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर निवडून आलेले सदस्य
- ३ सदस्य : मुस्लीम धर्मशास्त्र आणि कायद्यातील तज्ज्ञ, यापैकी एक शिया मुस्लीम
- ५ सदस्य : प्रशासन, वित्त, शिक्षण, संस्कृती किंवा सामाजिक कार्य इत्यादी सार्वजनिक क्षेत्रातील काम करणाऱ्या मुस्लीम स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी,
- १ सदस्य: राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष, आणि
- १ सदस्य: राज्य हज कमिटीचे कार्यकारी अधिकारी, हे पदसिध्द सदस्य
महाराष्ट्र राज्य हज समितीच्या सदस्यांच्या नियुक्तीचा कार्यकार ३ वर्षे इतका आहे.
महाराष्ट्रातील हज यात्रेकरु चार गंतव्य स्थान मुंबई , नागपूर, औरंगाबाद आणि हैद्राबाद येथून हज यात्रेवर जातात.
महाराष्ट्र हज समितीमार्फत खालीलप्रमाणे ३ श्रेण्यांमध्ये यात्रेकरु हजयात्रा करतात. मागिल ३ वर्षात सदर श्रेणींमध्ये हज यात्रा केलेल्या यात्रेकरुंचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
वर्ष |
श्रेणी |
श्रेणीनिहाय यात्रेकरुंचे प्राप्त झालेले अर्ज |
प्राप्त कोटा |
तिनही श्रेणीतीतून यात्रा केलेल्या यात्रेकरुंची एकत्रित एकूण संख्या |
२०१७ |
राखीव श्रेणी (७० वर्षे व अधिक) |
२७४८ |
९७८० |
१०१४० |
महिला श्रेणी (४५ वर्षे व अधिक) |
- |
सर्वसाधारण श्रेणी |
४२०५९ |
2018 |
राखीव श्रेणी ( 70 वर्षे व अधिक) |
1773 |
9244 |
10961 |
महिला श्रेणी (45 वर्षे व अधिक) |
12 |
सर्वसाधारण श्रेणी |
39800 |
2019 |
राखीव श्रेणी ( 70 वर्षे व अधिक) |
2254 |
11907 |
15268 |
महिला श्रेणी (45 वर्षे व अधिक) |
31 |
सर्वसाधारण श्रेणी |
33364 |
2020 |
राखीव श्रेणी ( 70 वर्षे व अधिक) |
कोविड 2019 च्या परिस्थितीमुळे सऊदी अरेबिया राज्याकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय हज यात्रा रद्द करण्यात आली होती.त्यामुळे सन 2020 मध्ये हजयात्रेकरिता महाराष्ट्र राज्यातून यात्रेकरु जावू शकले नाहीत. |
महिला श्रेणी (45 वर्षे व अधिक) |
सर्वसाधारण श्रेणी |
नागपूर हज हाऊस :- विदर्भ विभागातील हज यात्रेकरुंच्या सुविधेसाठी राज्य शासनाने भालदारपुरा नागपूर येथे नागपूर हज हाऊस या ६ मजली प्रशस्त इमारतीची उभारणी केलेली आहे. सदर इमारतीचा वापर हज मोसमाच्या पहिल्या टप्प्यात प्रस्थानाच्या ठिकाणावरुन ( embarkation point ) हज यात्रेसाठी उड्डान करणाऱ्या हज यात्रेकरुंच्या निवासाच्या व्यवस्थेसाठी तसेच सौदी अरब वरुन नागपूर प्रस्थानाच्या ठिकाणावरुन ( embarkation point ) परत येणाऱ्या हज यात्रेकरुंच्या निवासाच्या सोईसाठी केला जातो.
औरंगाबाद हज हाऊस :- मराठवाडयातील हज यात्रेकरुंच्या सुविधेसाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्व्हे क्र.6656,शाही मशिदी जवळ, औरंगाबाद येथे औरंगाबाद हज हाऊस या इमारतीचे बांधकाम करण्यात येत असून काम प्रगती पथावर आहे. लवकरच काम पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे.