उर्दु घर

महाराष्ट्र राज्यातील उर्दु घरे

महाराष्ट्रामध्ये उर्दू भाषेची वाड:मयीन प्रगती, मराठी व उर्दू भाषेमधील लेखक, कवी, विचारवंत इ. मध्ये सर्जनशील विचारांची देवाणघेवाण होऊन उर्दू भाषेचा वाड:मयीन विकास व्हावा व उर्दू भाषेच्या समृध्दीसाठी उर्दू घराच्या रुपाने एक ठिकाण असावे या उद्देशाने राज्यातील काही मुस्लीम बहुल शहरामध्ये उर्दू घर उभारण्याचे प्रस्तावित असून राज्यातील उर्दु घरांच्या प्रस्तावांची सद्य:स्थिती खालीलप्रमाणे आहे-

१. नांदेड

जिल्हाधिकारी, नांदेड यांनी उर्दू घरासाठी मदिना तुल उलूम शाळेजवळील मदिनानगर येथील ७३९० चौ.मी. इतकी जागा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार नांदेड शहरातील मदिना नगर येथील मदिना तुल उलूम शाळे जवळील सर्वे नं.१२६९२ येथील महानगर पालिकेच्या मालकीच्या भूखंडावर उर्दू घर बांधण्याच्या रु.८,१६,००,०००/- (रुपये आठ कोटी सोळा लक्ष फक्त) इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली असून दि.१७/०२/२०१४ रोजी सदर उर्दू घराची पायाभरणी करण्यात आलेली आहे. या उद्दिष्टाकरिता सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात सदर प्रयोजनासाठी रु.७० लाखाची आर्थिक तरतूद करण्यात आली असून त्यापैकी रु.४९ लक्ष इतके अनुदान वितरीत करण्यात आलेले आहे.

३. सोलापूर

सोलापूर येथे उर्दू घर बांधण्याबाबत मा.मुख्यमंत्री महोदयांनी निदेश दिले होते. त्यानुसार, सोलापूर येथील सर्वे नं.६१७२ मधील सोलापूर महानगरपालिकेच्या ताब्यातील १७०१ चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंडाचा ताबा शा.नि., म.व व.वि., क्र.जमीन ३७१३/पुबा १०९/प्र.क्र.सो-४२/ज-५, दि.२८/०२/२०१४ अन्वये उर्दु भवनाच्या निर्मितीसाठी अल्पसंख्यांक विकास विभागाला देण्याचे जिल्हाधिकारी, सोलापूर यांना निदेश देण्यात आले आहे.

वरील पार्श्वभुमीवर, सोलापूर शहरातील सर्वे नं.६१७२ मधील सोलापूर महानगरपालिकेच्या ताब्यातील १७०१ चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंडावर उर्दू घर बांधण्याचा रु.४,९९,५५,६७८.००/- (रुपय चार कोटी नव्याण्णव लाख पंचावन्न हजार सहाशे अठ्ठयात्तर हजार फक्त) इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास शासन निर्णय, अल्पसंख्यांक विकास विभाग, क्रमांक : सोउघ २०१४/प्र.क्र.६०/कार्या-४, दि.२८ फेब्रुवारी, २०१४ अन्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली असून सदर उर्दुघराचा बांधकामाची पायाभरणी समारंभाद्वारे दि.०३/०३/२०१४ रोजी सुरुवात करण्यात आलेली आहे. या उद्दिष्टाकरिता सन 2015-16 या आर्थिक वर्षात रु.49.00 लक्ष इतके अनुदान वितरीत करण्यात आलेले आहे. उर्वरित अनुदान वितरणाची कार्यवाही सुरु आहे.

4. मालेगांव

मालेगाव शहरातील सर्वे नं.169 मधील उर्दू शाळा क्र.64 च्या जवळील 20,000 चौ.फु. क्षेत्रफळाच्या भूखंडावर उर्दू घर बांधण्याच्या रु.4,00,00,000/- (रुपये चार कोटी मात्र) इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास शासन निर्णय, अल्पसंख्यांक विकास विभाग, क्र.अविवि 2015/प्र.क्र.55/कार्या-4, दि.21 मे, 2015 अन्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.