मौलाना आझाद मुदत कर्ज योजना
योजनेचे स्वरूप
- कर्ज मर्यादा: रु. 5 हजार ते रु. 5.00 लाखापर्यंत
- स्वगुंतवणूक: 5% | कर्ज: 95%
- व्याजदर: 6% + हमी शुल्क 2% = 8%
- परतफेड कालावधी: 5 वर्षे
- कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा:
- शहरी भागासाठी: रु. 1,20,000/- पेक्षा कमी
- ग्रामीण भागासाठी: रु. 98,000/- पेक्षा कमी
- लाभार्थ्यांचे वय:
- सर्वसाधारण लाभार्थी: 45 वर्षे
- विधवा व घटस्फोटित स्त्रिया: 50 वर्षे
- विमा संरक्षण: एकूण कर्ज रक्कमेच्या 3% रक्कम एकदाच विम्याचा हप्ता म्हणून कपात.
आवश्यक कागदपत्रे –
- विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक साक्षांकित कागदपत्रांच्या दोन प्रती.
- अल्पसंख्याक असल्याचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र)
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा:
(आधार कार्ड/इलेक्शन कार्ड/पारपत्रक (पासपोर्ट) / बँकेचे पासबुक/वाहन चालक परवाना / दूरध्वनी देयक / विद्युत देयक किंवा तलाठी / तहसिलदार यांनी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक) - ओळखपत्र: अर्जदार व जामिनदार दोन्हीचे. आधार कार्ड / इलेक्शन कार्ड / पारपत्रक ( पासपोर्ट )/ बँकेचे पासबुक / वाहन चालक परवाना / पॅन कार्ड यापैकी कोणतेही एक)
- उत्पन्न प्रमाणपत्र: कुटुंब प्रमुखाच्या नावे तहसिलदार यांनी निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला.
- विहित नमुन्यातील अर्जदार व जामिनदाराचे हमीपत्र.
- बेबाकी प्रमाणपत्र: महामंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचे / वित्तीय संस्थेचे कोणत्याही प्रकारचे कर्ज / थकबाकी नसल्याचे बेबाकी प्रमाणपत्र व इतर कोणत्याही बँकेचे / वित्तीय संस्थेचे कर्ज नसल्याबाबतचे मुळ प्रतीतील शपथपत्र.
- जामिनदार :- एक सक्षम जामिनदार ज्याची स्थावर (अचल) मालमत्ता गहाण (गहाणखत) करुन घेण्यात येते. (मालमत्ता मुल्यांकन पत्र, मालमत्तेची माहिती – 7/12 चा उतारा, 8-अ चा उतारा)
- मुदत कर्ज योजनेसाठी मालाचे दरपत्रक आवश्यक आहे.
नोट:-दारिद्र्य रेषेखालील उमेदवारांनी दारिद्र्य रेषेखाली असल्याबाबतचे प्राधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडावे.
लाभार्थी:
अल्पसंख्याक समुदायातील व्यक्ती
फायदे:
वर उल्लेख केलेल्या नुसार
अर्ज कसा करावा
वर उल्लेख केलेल्या नुसार