बंद

    पोलिस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण

    • तारीख : 03/07/2025 -

    सदर योजना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून न राबविता शासनामार्फत राबविण्यात येत आहे.

    योजनाविषयीचा शासन निर्णय


    १ सप्टेंबर, २०१८ (3.1 MB)

    वारंवार विचारले जाणारे प्रश्न

    1. योजनेचा उद्देश:
    2. केंद्र शासनाच्या 15 कलमी कार्यक्रमांतर्गत दिलेल्या सूचनांनुसार अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना स्पर्धात्मक परिक्षेमध्ये समान संधी मिळण्यासाठी व राज्यातील पोलीस सेवेमधील प्रमाण वाढविण्यासाठी शासन निर्णय क्र. अविवि-2009/ प्र.क्र.188/ 09/का.1, दि. 27.07.2009 अन्वये महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत सन 2009-10 या वर्षापासून ही योजना राबविण्यात येत आहे.

    3. योजनेचे स्वरुप:-
    4. गृह विभागाच्या विहित निकषानुसार लेखी परिक्षा व मैदानी चाचणीचे प्रशिक्षण देणे

    5. प्रशिक्षणाचा कालावधी :-
    6. 2 महिन्याचा राहील.

    7. उमेदवारांच्या निवडीच्या अटी व शर्ती:-
      • प्रशिक्षणार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु.२.५० लाख यापेक्षा जास्त नसावे.
      • उमेदवार अल्पसंख्यांक समाजातील असावा.
      • उमेदवार १८ ते २५ वयोगटातील असावा.
      • उमेदवारांची उंची पुरुष-१६५ से.मि. व महिला उंची-१५५ सें.मि.,छाती-पुरुष-७९ सें.मि.(फुगवून ८४ सें.मि.)
        शैक्षणिक पात्रता १२ वी पास.
      • रहिवासी दाखला, सेवायोजन कार्यालयांतर्गत नांव नोंदणी दाखला व ओळपत्राची सत्यप्रत देणे आवश्यक राहील.
    8. उमेदवारांची निवड:-
    9. जाहिरातीद्वारे प्राप्त अर्जातील पात्र अल्पसंख्यांक उमेदवारांची निवड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीमार्फत करण्यात येते.

    10. प्रशिक्षण कोणामार्फत देण्यात येते:-
    11. प्रशिक्षण खाजगी शैक्षणिक संस्था आणि प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत देण्यात येते.

    12. प्रशिक्षण संस्थांची निवड:-
    13. प्रशिक्षण संस्थांची निवड शासनामार्फत करण्यात येते.

    14. प्रशिक्षणामध्ये शिकविण्यात येणारे विषय :-
    15. सामान्य ज्ञान,मराठी भाषा आणि शारिरिक क्षमता हे विषय शिकविण्यात येतात.

    16. योजनेचा निधी :-
    17. योजनेचा निधी हा जिल्हाधिकारी यांना वितरीत करण्यात येतो. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत संबंधित प्रशिक्षण संस्थेला वितरीत करण्यात येतो.

      लाभार्थी:

      पोलिस शिपाई भरतीपूर्व

      फायदे:

      वर उल्लेख केलेल्या नुसार

      अर्ज कसा करावा

      वर उल्लेख केलेल्या नुसार