बंद

    नवीन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टि आय सुरू करणे

    • तारीख : 01/01/2024 - 31/12/2025

    देशातील अल्पसंख्याक समुदायाच्या आर्थिक व सामाजिक मागासलेपणाचा अभ्यास करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यास सक्षम करण्याच्या दृष्टीने शिफारशी करण्ययाकरिता केंद्र शासनाने मा.न्या. सच्चर समितीची स्थापना केली होती. या समितीने केलेल्या शिफारशींपैकी, अल्पसंख्याकांमध्ये शिक्षणाचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे व त्यामुळे आर्थिक मागासलेपणाचे प्रमाण देखील अतिशय लक्षणिय असल्याचे नमूद केले आहे.

    तसेच जागतिकीकरणामुळे देशात तसेच राज्यात औद्योगिकीकरण झपाटयाने होत आहे. या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळाचा विचार करता व्यवसाय प्रशिक्षणाच्या सुविधा आणि व्यवसाय प्रशिक्षणाच्या विद्यमान प्रवेश क्षमतेत वाढ करणे आवश्यक झाले आहे. याकरिता राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेने सन २०२२ पर्यंत देशात ५०० दशलक्ष कुशल मनुष्यबळाची निर्मीती करण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. त्यानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तसेच शासकीय तंत्रनिकेतनातील प्रवेश क्षमतेमध्ये भरीव वाढ करण्याचे शासनाचे उद्दीष्ट आहे. तसेच यायोगे राज्यातील अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना व्यवसाय प्रशिक्षणाच्या व तद्नुषंगाने रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात येऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे शासनाचे उद्दीष्ट आहे.

    याकरिता अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता अल्पसंख्याक बहुल भागात नवीन शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार आहेत. त्यानुसार मांडवी, जिल्हा-मुंबई शहर, मुंब्रा-कौसा, जिल्हा-मुंबई उपनगर व मालेगाव, जिल्हा-नाशिक येथे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता नवीन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. मांडवी येथे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे बांधकाम करुन सन २०२४-२५ पासून प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आले आहे.

    २९ ऑगस्ट, २००९ [पीडीएफ 1.57 एमबी]

    ११ ऑगस्ट, २०१० [पीडीएफ 115 केबी]

    या योजनेअंतर्गत निधी वितरित केलेले सर्व शासन निर्णय राज्य शासनाच्या संकेत स्थळावर जाऊन विभागाचे नाव : अल्पसंख्यांक विकास विभाग व महत्वाचा शब्द :औद्योगिक असे लिहून पाहू शकता.संकेत स्थळासाठी क्लिक करा

    लाभार्थी:

    अल्पसंख्याक उमेदवार

    फायदे:

    रोजगार पुरवणे

    अर्ज कसा करावा

    वर उल्लेख केलेल्या नुसार