बंद

    तंत्रनिकेतनमध्ये दुसरी पाळी

    • तारीख : 01/01/2024 - 31/12/2025

    जागतिकीकरणामुळे औद्योगिकीकरणात होत असलेली वाढ व त्यासाठी भविष्यात आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ याचा विचार करता व्यवसाय प्रशिक्षणाची प्रवेशक्षमता व प्रशिक्षण सुविधा वाढविणे आवश्यक झाले आहे. यादृष्टीने कुशल मुनष्यबळाची निर्मिती करणे व अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना या प्रशिक्षणाच्या व रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे याकरिता शासकीय तंत्रनिकेतनामध्ये दुसरी पाळी सुरु करण्यात आली आहे.

    योजनाविषयीचा शासन निर्णय


    १३ सप्टेंबर, २०११(PDF- 240 KB)


    १९ जुलै, २०१२ (pdf – 173 KB)

    नेहमीचे प्रश्न

    1. राज्यातील किती शासकिय तंत्रनिकेतनांमध्ये दुसरी पाळी उपलब्ध आहे व तेथे कोणते अभ्यासक्रम शिकविले जात आहेत :
    2. एकूण 14 शासकीय तंत्रनिकेतनामध्ये दुसरी पाळी उपलब्ध असून शासकीय तंत्रनिकेतनातील नियमित व्यवसाय अभ्यासक्रमांपैकी काही निवडक व्यवसाय अभ्यासक्रम दुसऱ्या पाळीत शिकविले जातात.

    3. या पाळीत प्रवेश कोणत्या पध्दतीने घेता येईल :
    4. शासकीय तंत्रनिकेतनातील नियमित प्रवेशाकरिता संचालक ( तंत्र शिक्षण ) यांनी विहित केलेल्या नियमानुसार दुसऱ्या पाळीत प्रवेश देण्यात येईल.

    5. प्रवेशाकरिता अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना कशाप्रकारे प्राधान्य आहे.
    6. दुसऱ्या पाळीमध्ये प्रवेशाकरिता एकूण प्रवेश क्षमतेच्या ७०% जागा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी व ३० % जागा अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवण्यात येतात.

    7. दुसऱ्या पाळीतील प्रवेशासाठी किती शुल्क आकारण्यात येईल :

    यासाठी शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या दराने शुल्क आकारण्यात येईल.

    दुसरी पाळी सुरु असलेले तंत्रनिकेतन व अभ्यासक्रमांची यादीच्या पी.डी.एफ.साठी
    येथे क्लिक करा(PDF- 40.6 KB)

    या योजनेअंतर्गत निधी वितरित केलेले सर्व शासन निर्णय राज्य शासनाच्या संकेत स्थळावर जाऊन विभागाचे नाव : अल्पसंख्यांक विकास विभाग व महत्वाचा शब्द : तंत्रनिकेतन असे लिहून पाहू शकता.संकेत स्थळासाठी इथे क्लिक करावे

    लाभार्थी:

    अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना

    फायदे:

    रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे

    अर्ज कसा करावा

    वर उल्लेख केलेल्या नुसार