कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (शिक्षा मंत्रालय)
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय.दुर्बल घटक व वंचित गटांतील शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या संधी प्राप्त व्हाव्यात, या दृष्टीकोनातून राज्यातील १० जिल्ह्यातील ४३ शैक्षणिकदृष्ट्या मागास गटांमध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये ही केंद्र पुरस्कृत निवासी योजना सुरु करण्यात आली आहे.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील तरतूदींनुसार इयत्ता ६ वी ते ८ वी उच्च प्राथमिक या स्तरावरील विद्यार्थिनींकरिता सदर योजना लागू आहे. या विद्यालयांमध्ये दुर्बल व वंचित गटातील विशेष गरजाधिशिष्ट मुलींकरिता २५% जागा प्राधान्याने उपलब्ध करण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार यांचे संकेतस्थळ इथे क्लिक करावे
योजनेच्या ठळक बाबी :-
- प्रति विद्यार्थिनी रु. १५००/- प्रति महिना याप्रमाणे एकूण रु. १८.०० लक्ष इतक्या वार्षिक अनुदानाची तरतूद. यामध्ये किराणा साहित्य, भाजीपाला, फळे, दूध, गॅस सिलींडर, सरपण, मांसाहार, साबण, टूथपेस्ट, टूथब्रश, गणवेष, बूट, चप्पल इ. बाबींवर खर्च करण्याची मुभा.
- कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थीनींना दरमहा निर्वाह खर्चाची तरतुद करण्यात आली आहे.
- दरमहा मुलींच्या राष्ट्रीयकृत बँकेतील किंवा पोस्ट ऑफिसमधील वैयक्तीक बचत खात्यात विद्यावेतनाची रक्कम दरमहा 5 तारखेपर्यंत जमा करण्याची तरतुद.
- प्रति विद्यार्थीनी प्रतिमाह रुपये 1000/- इतकी रक्कम अध्ययन साहित्य, स्टेशनरी, व इतर शैक्षणिक साहित्यासाठी मंजुर.
मार्गदर्शक सूचना [पीडीएफ 63 केबी]
मार्गदर्शक सूचना २०१४-१५ [पीडीएफ 1.35 एमबी]
मार्गदर्शक सूचना २०१८-१९ [पीडीएफ 4.4 एमबी]
लाभार्थी:
शालेय विद्यार्थी
फायदे:
दुर्बल घटक व वंचित गटांतील शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या संधी प्राप्त
अर्ज कसा करावा
वर उल्लेख केलेल्या नुसार