बंद

    उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी राज्य शासनाची अल्पसंख्याक शिष्यवृत्ती

    • तारीख : 03/07/2025 -


    ०३ नोव्हेंबर, २०१८[पीडीएफ- ३.२ एमबी]


    १४ ऑक्टोबर २०११)[पीडीएफ- 2.1 एमबी]

    नेहमीचे प्रश्न

    1. योजनेसाठी पात्रता व अटी काय आहेत ?
    2. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

      अर्जदाराने माध्यमिक शालान्त परीक्षा महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्ण केलेली असावी.

      अर्जदाराच्या पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये ८.०० लाखांपेक्षा जास्त नसावे.

      अर्जदार इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभार्थी नसावा.

      नूतनीकरणासाठी अर्जदाराने पुढील वर्षात प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे

    3. शिष्यवृत्तीची रक्कम किती आहे ?
    4. सदर योजनेंतर्गत तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच वैद्यकीय व अर्धवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रतिवर्ष रु. २५,०००/- किंवा प्रत्यक्ष वार्षिक शैक्षणिक शुल्क या पैकी जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येते. तर कला, विज्ञान वा वाणिज्य, कृषी, विधी व इत्तर कला शाखांतील अभ्यासक्रमाच्या तेवढी रक्कम शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येते.

    5. अर्ज कसा करावा ?
    6. सदर योजनेचा अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक व जाहिरात दरवर्षी संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय व संचालक वैद्यकीय शिक्षण संचालनालय यांचेमार्फत प्रमुख्‍ वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द करण्यात येते. सदर वेळापत्रकानुसार संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी खालील संकेत स्थळांवर क्लिक करा.
      mahadbtmahait.gov.in
      www.dmer.org
      www.dte.org.in
      अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या

    7. शिष्यवृत्तीची रक्कम कशा प्रकारे मिळेल ?
    8. पात्र विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम E.C.S. / N.E.F.T द्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे जमा करण्यात येते.

    9. शिष्यवृत्तीशी संबंधित अडचणी / अधिक माहितीसाठी कोणाकडे संपर्क साधावा ?
    10. वैद्यकीय व अर्धवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तीसाठी संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय इमारत चौथा मजला, सेंट जॉर्जस रुग्णालय आवार, मुंबई – ४०० ००१ आणि तांत्रिक व व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तीसाठी संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय ३ महानगरपालिका मार्ग , मुंबई-४०० ००१ यांचेकडे संपर्क साधावा. तसेच इयत्ता बारावी नंतरच्या इतर उच्च शिक्षणातील अभ्यासक्रम, उदा. कला, विज्ञान आणि वाणिज्य तसेच कृषी, विधी व इतर कला शाखांतील अभ्यासक्रमाच्या संदर्भात संचालक (उच्च शिक्षण) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे संपर्क साधावा.

      या योजनेअंतर्गत निधी वितरित केलेले सर्व शासन निर्णय राज्य शासनाच्या संकेत स्थळावर जाऊन विभागाचे नाव : अल्पसंख्यांक विकास विभाग व महत्वाचा शब्द : Scholarship किंवा शिष्यवृत्ती असे लिहून पाहू शकता.

      लाभार्थी:

      शिक्षणासाठी कर्ज हवे असलेले विद्यार्थी

      फायदे:

      वर उल्लेख केलेल्या नुसार

      अर्ज कसा करावा

      वर उल्लेख केलेल्या नुसार