बंद

    अमराठी शाळेचे (इंग्रजी माध्यम वगळून) मराठी भाषा शिकवणी वर्ग योजना

    • तारीख : 03/07/2025 -

    योजनाविषयीचा शासन निर्णय


    २७ एप्रिल, २०१५ (171 KB)


    १४ जून, २०२१ (140 KB)

    वारंवार विचारले जाणारे प्रश्न

    1. योजनेचा उद्देश:
    2. केंद्रीय लोकसेवा आयोग / महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अल्पसंख्याक उमेदवारांना यशाच्या पुरेशा संधी उपलब्ध करुन देण्याकरीता आणि त्यासाठी मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व निर्माण करण्याकरीता राज्यातील इंग्रजी माध्यम वगळता इतर अमराठी शाळांमध्ये .8वी, 9वी व 10 वी मध्ये शिकत असलेल्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता सन 2006 पासून मराठी भाषा फौंडेशन वर्ग योजना एैच्छिक स्वरुपात राबविण्यात येत आहे.

    3. प्रस्ताव सादर करणे:
    4. अमराठी शाळांनी आणि त्यांच्या इच्छेनुसार शिक्षणाधिकारी निरंतर यांच्याकडे त्यावर्षातील 1 जुलै यापूर्वी अर्ज दाखल करणे आवश्यक राहील.

    5. मानसेवी शिक्षकांची नियुक्ती : –
    6. अमराठी शाळेतील प्राप्त अर्जानुसार बी.एड./एम.एड अशी अर्हता धारण करणा-या पात्र शिक्षकांची निवड शिक्षण अधिकारी (निरंतर) हे संचालक, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण सचनालय यांच्या मान्यतेने करतात.

    7. योजनेचा कालावधी :-
    8. दिनांक १ जुलै ते ३१ मार्च असा ९ महिन्यांचा राहिल.

    9. शिक्षकांचे मानधन :-
    10. मानसेवी शिक्षकांना प्रती महिना रु. ५,०००/- एवढे मानधन देण्यात येते.

    11. शिकविण्यात येणारे विषय :-
    12. मराठी व्याकरण, सारांश लेखन, उताऱ्यावरील प्रश्न, दोन व्यक्तींमधील संवाद,गटचर्चा, भाषण कला,पत्रव्यवहार, निबंध लेखन, अर्ज लेखन व अहवाल लेखन हे विषय शाळेच्या वेळेनंतर शिकविण्यात येतात.

    13. योजनेची अंमलबजावणी :-
    14. योजनांची अंमलबजावणी संचालक, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचलनालय यांच्या वतीने शिक्षण अधिकारी (निरंतर) हे करतात.

    15. निधी वितरण :-

    शासनाकडून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाला व आयोगाकडून संचालक अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचनालय यांचे मार्फत संबंधित शिक्षकांच्या बँक खात्यावर निधी जमा करण्यात येतो.

    लाभार्थी:

    शालेय विद्यार्थी

    फायदे:

    वर उल्लेख केलेल्या नुसार

    अर्ज कसा करावा

    वर उल्लेख केलेल्या नुसार