बंद

    प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम

    • तारीख : 01/01/2024 - 31/12/2025

    प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम (पीएमजेव्हीके) हा अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील अल्पसंख्यांक समुदायांना विशेषत: शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकास क्षेत्रात चांगल्या सामाजिक आर्थिक पायाभूत सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सूरू करण्यात आला आहे. ज्यामुळे राष्ट्रीय सरासरी आणि अल्पसंख्यक समुदायांमधील मागासलेपणाची दरी कमी होण्यास मदत होईल.

    प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमाच्या पूर्वी, केंद्र शासनाद्वारे २००8-०9 या वर्षा पासून बहु-क्षेत्रीय विकास कार्यक्रम राबविण्यात आला. तदनंतर २०१8 पासून प्रभावी अंमलबजावणीसाठी पूर्वीच्या बहु-क्षेत्रीय विकास कार्यक्रमा (एमएसडीपी) ची पुनर्रचना व नामकरण पंतप्रधान जन विकास कार्यक्रम असे करण्यात आले आहे.

    प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमा अंतर्गत अंमलबजावणी क्षेत्राची ओळख ही 2011 च्या जनगणनेतील अल्पसंख्याक लोकसंख्या व सामाजिक – आर्थिक सुविधाच्या आकडेवारीच्या आधारे अल्पसंख्याक बहुल क्षेत्र म्हणून करण्यात आली. त्यानुसार देशात 870 अल्पसंख्याक बहुल गट, 321 अल्पसंख्याक बहुल शहरे, आणि 109 अल्पसंख्याक बहुल जिल्हे म्हणून ओळखण्यात आलेली आहेत. या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील खालीलप्रमाणे 24 जिल्ह्यातील 10 जिल्हा मुख्यालये, 28 गट व 34 शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

    प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम
    अ.क्र. जिल्हे बहुक्षेत्र विकास कार्यक्रमाखाली प्रस्तावित केल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक लोकसंख्या असलेली जिल्हा मुख्यालये ,गट, शहरे यांची नावे.
    जिल्हा मुख्यालये जिल्हा मुख्यालये गट शहरे
    1 मुंबई उपनगर मुंबई उपनगर
    2 मुंबई मुंबई
    3 बुलडाणा बुलडाणा शेगाव, नांदुरा, मोताळा, खामगाव, बुलडाणा, चिखली मलकापूर, खामगांव, बुलडाणा
    4 अकोला अकोला तेल्हारा, आकोट, बाळापूर, अकोला, मुर्तीजापूर, पातूर, बार्शीटाकळी. बाळापूर, अकोला, आकोट
    5 वाशिम वाशिम मंगळूरपीर, कारंजा कारंजा, वाशिम,
    6 अमरावती अमरावती अंजनगांव सुर्जी, चांदूरबाजार, मोर्शी, अमरावती, भातकुली, दर्यापूर, नांदगांव-खांडेश्वर अचलपूर
    7 नांदेड नांदेड अर्धापूर, नांदेड
    8 औरंगाबाद औरंगाबाद सिल्लोड सिल्लोड, मनमाड
    9 चंद्रपूर चंद्रपूर चंद्रपूर, बल्लारपूर
    10 रत्नागिरी मंडणगड रत्नागिरी
    11 नाशिक ज्ञाने
    12 नंदुरबार नंदुरबार
    13 धुळे धुळे
    14 जळगांव भुसावळ
    15 नागपूर कामटी
    16 यवतमाळ यवतमाळ, पुसद
    17 हिंगोली हिंगोली हिंगोली हिंगोली
    18 परभणी परभणी बसमत, जिंतूर, परभणी
    19 जालना जालना
    20 अहमदनगर श्रीरामपूर
    21 बीड बीड, परळी, अंबाजोगाई
    22 लातूर लातूर, उदगिर
    23 उस्मानाबाद उस्मानाबाद
    24 सांगली सांगली
    24 10 28 34

    प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमा अंतर्गत ऑक्टोंबर, 2020 पर्यंत एकूण रू. 14.47 कोटी किमतीच्या खालीलप्रमाणे प्रकल्पांना मान्याता देण्यात आली आहे.तसेच आतापर्यंत रू. 5.52 कोटी इतका निधी मंजूर करून वितरित करण्यात आला आहे.

    प्रकल्पांच्या परिपूर्ण माहितीसाठी इथे क्लिक करा डाटाबेस –

    लाभार्थी:

    अल्पसंख्यांक समुदाय

    फायदे:

    शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकास क्षेत्रात चांगल्या सामाजिक आर्थिक पायाभूत सुविधा पुरवने

    अर्ज कसा करावा

    वर उल्लेख केलेल्या नुसार