बंद

    उद्दिष्टे आणि कार्ये

    अल्पसंख्याक लोकसमुहांच्या सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक व सांस्कृतिक अशा सर्वसमावेशक उत्कर्षासाठी तसेच अल्पसंख्याकांच्या हक्काचे संरक्षण करणे.

    1. अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधानांच्या १५ कलमी कार्यक्रमाचे समन्वयन व आढावा.
    2. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे शासकीय स्तरावरील संनियंत्रण आणि समन्वयन.
    3. महाराष्ट्र राज्य हज समितीचे शासकीय स्तरावरील संनियंत्रण आणि समन्वयन.
    4. राज्यातील अल्पसंख्याकांकडून चालविण्या जाणा-या शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्रे देणे.
    5. वक्फ (वक्‍फ अधिनियमांसह) व त्या अनुषंगीक बाबींची शासकीय स्तरावरील अंमलबजावणी, संनियंत्रण व समन्वयन.
    6. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे शासकीय स्तरावरील संनियंत्रण व समन्वयन.
    7. महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी यांचे शासकीय स्तरावरील संनियंत्रण व समन्वयन.
    8. महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमी.
    9. न्यायमुर्ती सच्चर समितीच्या स्वीकृत शिफारशीसंबंधातील बाबींची अंमलबजावणी, संनियंत्रण व समन्वयन.
    10. अल्पसंख्याकांसाठी केंद्र पुरस्कृत विविध योजनांचे राज्यस्तरीय समन्वयन.
    11. राज्य शासनाने अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी जाहीर केलेल्या सर्व योजनांचे समन्वयन व आढावा.
    12. अल्पसंख्याकांच्या विकासाबाबत वेळोवेळी तज्ञांचे/तज्ञ संस्थांचे अभ्यासगट नेमून त्याआधारे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करणे.
    13. अल्पसंख्याकांशी संबंधित इतर विषय.