मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबंध योजना
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- योजनेचा उद्देश:
- योजनेची अंमलबजावणी :-
- योजनेंतर्गत शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्रे:-
राज्यातील अल्पसंख्यांक उमेदवारांना शासकीय/निमशासकीय सेवेत संधी उपलब्ध होण्यासाठी केंद्रिय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँकिंग सेवा भरती तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परिक्षेच्या व इयत्ता १० वी तसेच १२ वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणी वर्ग सुरु करणे.
खाजगी प्रशिक्षण संस्थेमार्फत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. राज्यातील मुंबई,ठाणे, पुणे,नाशिक,नागपूर,अमरावती व औरंगाबाद या केंद्रांवर प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जातो. या सात केद्रांकरीता खाजगी प्रशिक्षण संस्थेची निवड शासनामार्फत करण्यात येते.
अ.क्र. | वर्ष | निवड केलेल्या प्रशिक्षण संस्थाची संख्या | प्रशिक्षण दिलेल्या विद्यार्थ्याची संख्या |
---|---|---|---|
1 | 2014-15 | 9 | 1650 |
2 | 2015-16 | 13 | 2940 |
3 | 2016-17 | 18 | 4000 |
4 | 2017-18 | 30 | 4000 |
5 | 2018-19 | – | – |
6 | 2019-20 | 18 | 4000 |
Total | 88 | 16590 |
टिप :-
सन 2020-21 मध्ये कोव्हिड 19 विषाणू संसर्गामुळे संस्थाची निवड करण्यात आलेली नाही.
या योजनेअंतर्गत निधी वितरित केलेले सर्व शासन निर्णय राज्य शासनाच्या संकेत स्थळावर जाऊन विभागाचे नाव : अल्पसंख्यांक विकास विभाग व महत्वाचा शब्द : मोफत शिकवणी असे लिहून पाहू शकता.
लाभार्थी:
शिक्षणासाठी कर्ज हवे असलेले विद्यार्थी
फायदे:
वर उल्लेख केलेल्या नुसार
अर्ज कसा करावा
वर उल्लेख केलेल्या नुसार