उर्दु साहित्य अकादमी
महाराष्ट्र राज्य उर्दु साहित्य अकादमी
महाराष्ट्र राज्य उर्दु साहित्य अकादमीची स्थापना प्रथमता शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.ईयुए-१०७५/एल-जेजे, दि.१६ एप्रिल, १९७५ अन्वये करण्यात आली होती. तद्नंतर वेळोवेळी महाराष्ट्र राज्य उर्दु अकादमीची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. अलिकडेच शासन निर्णय, अल्पसंख्याक विकास विभाग, क्रमांक : उसाअ २०१४/प्र.क्र.२३३/कार्यासन-४, दिनांक : २९ ऑगस्ट, २०१५ अन्वये सदर अकादमीची पुनर्रचना करण्यात आलेली असून पुनर्रचित अकादमी पुढीलप्रमाणे आहे-
अ.क्र. | नांव / हुद्दा | पद |
---|---|---|
शासकीय सदस्य | ||
1 | मा. मंत्री (अल्पसंख्यांक विकास) | अध्यक्ष |
2 | मा. राज्यमंत्री (अल्पसंख्यांक विकास) | उपाध्यक्ष |
3 | प्रधान सचिव (अल्पसंख्यांक विकास विभाग) | शासकीय सदस्य |
4 | उप/सह सचिव (अल्पसंख्यांक विकास विभाग) | अशासकीय सदस्य |
अशासकीय सदस्य | ||
5 | श्री, रऊफ खान मजीद खान, खडका रोड, भुसावळ, जळगांव | कार्याध्यक्ष |
6 | श्रीमती कमरुन्निसा सईद, हुर विल्ला, पहिला माळा, मराठा मंदिर सिनेमासमोर, मुंबई सेंट्रल, मुंबई-८ | सदस्य |
7 | श्री. रफीक ए. शेख, ३/९९, जमात चाल, मस्जिद जवळ, मोगापाडा, अंधेरी (पूर्व), मुंबई-६९ | सदस्य |
8 | श्रीमती एजाज फातेमा पाटणकर, नावेरी, ता.संमेश्वर, जि. रत्नागिरी | सदस्य |
9 | श्री. काझी इरशोद्दीन रशीदोद्दीन, बिलाल उर्दू प्राथमिक शाळा, हमालवाडी, स्टेशन रोड, परळी वैजनाथ, जि. बीड | सदस्य |
10 | श्री. अस्लम तन्वीर कवी, पो. नसिराबाद, ता.व जि. जळगांव | सदस्य |
11 | श्री. शेख हनीफ शेख रशीद, सावदा, ता. रावेर, जि. जळगांव | सदस्य |
12 | श्री. अब्दुल मजीद अब्दुल हमीद शेख (छोटा मजीद शोला), देसाईगंज, वळसा, गडचिरोली | सदस्य |
13 | श्री. मसुद ऐजाज, खिलाफत हाऊस, जफरनगर, पांढरकवडा रोड, यवतमाळ | सदस्य |
14 | श्री. अझीम राही, साखरखेडा, बुलढाणा | सदस्य |
15 | श्री. फारुक सय्यद, ३२१/४४, मुस्लिम पच्छा पेठ, सोलापुर-५ | सदस्य |
- कार्यकक्षा :
- महाराष्ट्र राज्य उर्दु साहित्य अकादमी साठी अर्थसंकल्पिय तरतूद :
- महाराष्ट्र राज्य उर्दु साहित्य अकादमी मार्फत देण्यात येणारे पुरस्कार :
उर्दु भाषेचे जतन, संवर्धन व प्रसार होण्याच्यादृष्टीने इतर भाषिकांसाठी उर्दु वर्ग सुरु करणे, इम्कान या त्रैमासिकाचे प्रकाशन, चर्चासत्रे, महफिले मुशायरा चे आयोजन करणे, उर्दु शाळा व महाविद्यालयांना वाड्मयीन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सहाय्यक अनुदान मंजूर करणे, उर्दु ग्रंथालये/वाचनालये स्थापन करणे, उर्दु ग्रंथालयांना मासिके व पुस्तकांच्या स्वरुपात सहाय्यक अनुदान मंजूर करणे, उर्दु पुस्तक प्रदर्शनांचे आयोजन करणे, उर्दु नाट्य एकांकिका स्पर्धा/नाट्य कार्यशाळा आयोजन करणे/नाट्य एकांकिका लेखकास उत्तेजनपर पारितोषिके देणे, उर्दु हस्तलिखितांचे प्रकाशन व मराठी-उर्दु अनुवादकांना आर्थिक अनुदान देणे, उर्दु पुस्तांकांना पारितोषिके देणे, पदवी/पदव्युत्तर परिक्षेत उर्दु विषयात सर्वोत्तम गुण मिळवणाऱ्या विद्याथ्यांना पारितोषक देणे, आजारी अवस्थतेतील प्रसिध्द उर्दु लेखक, कवी ई. ना आर्थिक मदत करणे, विद्यापिठांना उर्दु विभाग सुरु करण्यासाठी अनुदान देणे, उर्दु पत्रकारांसाठी दर वर्षी कार्यशाळेचे आयोजन करणे, ई. स्वरुपाची कामे उर्दु साहित्य अकादमी मार्फत केली जातात.
महाराष्ट्र राज्य उर्दु साहित्य अकादमीसाठी शासनाने चालू आर्थिक वर्षात (सन २०१५-१६) मध्ये योजनांतर्गत रु.७०.०० लाख तसेच योजनेतर रु.२० लक्ष ची अर्थसंकल्पिय तरतूद केलेली आहे.
महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत दरवर्षी नामवंत कवी, लेखक, विचारवंत तसेच उर्दू भाषेच्या विकासासाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना अकादमीमार्फत पुरस्कार प्रदान करण्यात येतात. संत ज्ञानेश्वर राष्ट्रीय पुरस्कार हा अकादमी मार्फत देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार असून सन २०१२ वर्षाकरिता सदर पुरस्कार मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सुप्रसिध्द कवी गुलजार यांना प्रदान करण्यात आलेला आहे. अकादमी मार्फत वितरीत करण्यात येत असलेल्या प्रस्तावांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –
अ.क्र. | पुरस्काराची नावे | रक्कम रुपये |
---|---|---|
१ | संत ज्ञानेश्वर राष्ट्रीय पुरस्कार | ५१,००० |
२ | वली दक्कनी राष्ट्रीय पुरस्कार | ३०,००० |
३ | सिराज औरंगाबादी राज्य पुरस्कार | २५,००० |
४ | सेतू माधवराव पगडी मराठी-उर्दू भाषांतर पुरस्कार | १५,००० |
५ | उद्योन्मुख लेखकांना साहीर लुधियान्वी पुरस्कार | १०,००० |
६ | पत्रकारिते करिता हारुन रशिद पुरस्कार (४ x १०,०००) | ४०,००० |
७ | विशेष पुरस्कार (१० x १०,०००) | १,००,००० |
८ | शिक्षक पुरस्कार (१० x १०,०००) | १,००,००० |
९ | पुस्तकांना पुरस्कार | १,५०,००० |
एकूण | ५,२१,००० |
अधिक्षक नि -कार्यकारी अधिकारी,महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी, मुंबई
अधिक्षक नि-कार्यकारी अधिकारी,महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी, मुंबई या पदावर सद्य:स्थिती श्री.एस.व्ही.एच. काद्री हे कार्यरत आहेत. त्यांचा कार्यालयीन पत्ता व दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहे.