बंद

    नागरी क्षेत्रविकास

    • तारीख : 01/01/2024 - 31/12/2025

    राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रांत मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी क्षेत्रविकास कार्यक्रम योजना :-


    18 जून, 2015 (109 केबी)

    9 मार्च, 2016 [पीडीएफ 2 एमबी]

    वारंवार विचारले जाणारे प्रश्न

    1. योजनेचा उद्देश:
    2. शासन निर्णय, क्र.क्षेविका-२०१५/प्र.क्र.७६/कार्या-९,दि.१८-६-२०१५ अन्वये राज्यातील ज्या महानगरपालिका/नगरपालिका/नगरपरिषद यांची अल्पसंख्यांक समुहाची लोकसंख्या किमान १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा महानगरपालिका/नगरपालिका/ नगरपरिषद यांना मूलभूत/पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना राबविण्यात येते. तसेच पुढीलप्रमाणे निधी मंजूर करण्यात येतो.

      • महानगरपालिका – रु. २०.०० लक्ष
      • अ-वर्ग नगरपालिका – रु. १५.०० लक्ष
      • ब व क वर्ग नगरपालिका/नगरपंचायत- रु. १०.०० लक्ष
    3. या योजनेमध्ये कोणती कामे घेण्यात येतात:-
    4. या योजनेंतर्गत अनुज्ञेय मुलभूत नागरी सुविधांची पुढील कामे घेण्यात येतात :-

      1. कब्रस्तानची व अंत्यविधीच्या जागेची दुरुस्ती
      2. पिण्याच्या पाण्याची सुविधा
      3. विद्युत पुरवठा
      4. सांडपाण्याची व्यवस्था
      5. रस्ते / पथदिवे
      6. सार्वजनिक स्वच्छतागृहे
      7. अंगणवाडी, बालवाडी केंद्रे
      8. समाजमंदिर / सामाजिक सभागृह
      9. इदगाह
    5. या योजनेसाठी प्रस्ताव कोणाकडे सादर करावयाचा :-
    6. महानगरपालिका/नगरपालिका/नगरपरिषद यांनी संबंधीत जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास प्रस्ताव शासनाने विहित केलेल्या दिनांकापर्यंत सादर करणे आवश्यक आहे. यासाठी अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत वृतपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात येईल.

    7. प्रस्तावा सोबत कोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे:-
    8. प्रस्तावासोबत खालील कागदपत्रे जोडण्यात यावीत-

      1. शासन निर्णयासोबतचे प्रपत्र-अ त्यामध्ये या योजनेंतर्गत घेण्यात येणारी विकासकामे, अंदाजपत्रक, विकासकाम पुर्ण होण्यास लागणारा कालावधी तसेच संबंधीत महानगरपालिका/नगरपालिका/ नगरपंचायत यामधील एकूण लोकसंख्या व अल्पसंख्यांक समुहाची लोकसंख्या याची माहिती देण्यात यावी.
      2. विकास काम हाती घेण्यास संबंधित महानगरपालिका/नगरपालिका/नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेने मंजूरी दिलेल्या ठरावाची प्रत.
      3. हाती घ्यावयाच्या विकासकामाचे सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा महानगरपालिका/नगरपालिका/नगरपरिषद यांच्या अभियंत्याने मान्यता प्रदान केलेले अंदाजपत्रक
      4. यापूर्वी या योजनेंतर्गत महानगरपालिका/नगरपालिका/नगरपरिषद यांना अनुदान मंजूर करण्यात आले असल्यास त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र अथवा हाती घेण्यात आलेल्या विकासकामाचा प्रगती अहवाल.
    9. अनुदानाची रक्कम कशा प्रकारे उपलब्ध होईल.

    महानगरपालिका/नगरपालिका/नगरपरिषद यांना मंजूर केलेले अनुदान संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना शासनाकडून वितरीत केले जाईल. त्यानंतर त्याचे वाटप संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात येईल.

    लाभार्थी:

    अल्पसंख्याक उमेदवार

    फायदे:

    नागरी क्षेत्रांत मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध

    अर्ज कसा करावा

    वर उल्लेख केलेल्या नुसार