मौलाना आझाद थेट कर्ज योजना

मौलाना आझाद थेट कर्ज योजना

 1. कर्ज मर्यादा रु.5 हजार ते रु.50 हजार पर्यत
 2. स्वगुंतवणूक 5 %, कर्ज 95 %
 3. व्याजदर (द.सा.द.शे.) 6 %
 4. परतफेड - 5 वर्षाच्या कालावधीत

पात्रता

 1. अर्जदार अल्पसंख्याक समाजातील असावा. मुस्लिम, शिख, ख्रिश्चन, पारशी, बुध्दीष्ट व जैन समाजाचा समावेश.
 2. अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
 3. अर्जदार कमीत कमी साक्षर असावा.
 4. वयोमर्यादा किमान 18 वर्ष
 5. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न
  शहरी भागासाठी - रु.1,03,000/- पेक्षा कमी, ग्रामीण भागासाठी -रु.81,000/- पेक्षा कमी.

मौलाना आझाद थेट कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे -

 1. विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक सांक्षाकित कागदपत्रांच्या दोन प्रती
 2. अल्पसंख्याक असल्याचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र)
 3. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा
  (आधारकार्ड/इलेक्शन कार्ड/पारपत्रक (Passport) /बँकेचे पासबुक/ड्रायव्हिंग लायसन्स/ पॅनकार्ड यापैकी कोणतेही एक)
 4. ओळखपत्र : अर्जदार व जामिनदार दोन्हीचे (आधारकार्ड/इलेक्शन कार्ड/पारपत्रक (Passport) /बँकेचे पासबुक/ड्रायव्हिंग लायसन्स/ पॅनकार्ड यापैकी कोणतेही एक)
 5. उत्पन्न प्रमाणपत्र :
  कुटुंब प्रमुखाच्या नावे तहसिलदार/तलाठी यांनी निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला/शासकीय व खाजगी क्षेत्रातील कर्मचारी असल्यास फॉर्म नं.16 किंवा 20 रुपयाच्या बाँड पेपरवर अर्जदाराने स्वत: प्रमाणित केलेल्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
 6. विहित नमुन्यातील अर्जदार/जामिनदाराचे हमीपत्र
 7. बेबाकी प्रमाणपत्र : महामंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्जदाराचे खाते असलेल्या बॅकेचे/वित्तीय संस्थेचे कोणत्याही प्रकारचे कर्ज/थकबाकी नसल्याचे बेबाकी प्रमाणपत्र व इतर कोणत्याही बँकेचे /वित्तीय संस्थेचे कर्ज नसल्याबाबतचे मूळ प्रतीतील शपथपत्र.
 8. जामिनदार : अर्जदारास ओळखणाऱ्या व्यक्तीकडून कर्जासाठी हमी देत असल्याचे, जामीन राहात असल्याचे व अर्जदाराने परतफेड न केल्यास परतफेडीची स्वत: जबाबदारी स्विकारत असल्याबाबत विहित नमुन्यातील रु.100/- च्या स्टँप पेपरवरील हमीपत्र.
 9. विधवा महिलांसाठी पतीचा मृत्यू झाल्याबाबतचा ग्रामसेवक/नगरपालिका/महानगरपालिका यांनी प्रमाणित केलेला दाखला.
 10. घटस्फोटीत महिलांकरिता घटस्फोट झाल्याबाबतचा न्यायालयाचा दाखला किंवा रु.20/- च्या बाँड पेपरवर अर्जदाराचे स्वयंघोषित प्रमाणपत्र.
 11. दंगलपिडीत व्यक्तीबाबत पोलीस पंचनाम्याची प्रत.
 12. नैसर्गिक आपदग्रस्त व्यक्तींबाबत तलाठी/तहसिलदार/जिल्हाधिकारी यांचा अहवाल
 13. अपंग व्यक्ती ज्यांचे (अपघातामध्ये अपंगत्व आलेल्या व्यक्तींसहित) पाय व हात/अंधत्व/मुकबधिर/कर्णबधिर कमीत कमी 40 % अशा व्यक्तींना शासकीय रुग्णालयातील/जिल्हा शल्यचिकित्सक यांनी प्रमाणित केलेला दाखला सादर करणे आवश्यक राहील.
नोट:- दारिद्रय रेषेखालील उमेदवारासंनी दारिद्रय रेषेखाली असल्याबाबतचे प्राधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडावे.
उपरोक्त योजनेअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी आवश्यकतेनुसार आगाऊ धनादेश व ईसीएस पत्र घेण्यात येते.