महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद

भारत सरकारने वक्फ अधिनियम, १९९५ हा कायदा पारीत करुन संपूर्ण देशात लागू केला. सदर कायदा महाराष्ट्र राज्यात दि.०१/०१/१९९६ पासून लागू करण्यात आलेला असून या कायद्यातील तरतुदींनुसार शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्र.वक्फ-१०/२००१/प्र.क्र.१५४/ल-३, दि.४ जानेवारी, २००२ अन्वये, औरंगाबाद येथे मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील वक्फांची संख्या सुमारे २७,००० इतकी असून या सर्व वक्फांची मिळून एकूण सुमारे १,००,००० एकर इतकी जमीन आहे. यापैकी सुमारे ७० टक्के वक्फ जमिनी अतिक्रमणाखाली आहेत. सुमारे ११५ भूखंडावर शासकीय/निमशासकीय वा स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्यालय असल्याचा वक्फ मंडळाचा अहवाल आहे. स्थानिक वक्फ मालमत्तेचे संरक्षण करणे, विकास करणे तसेच हजारो वक्फ संस्थांच्या व्यवस्थापन समित्यांचे तंटे सोडविणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, इ. कामे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या प्रशासकीय व्यवस्थापनेकडे सोपविण्यात आलेली आहेत.

१.१ वक्फ अधिनियम, १९९५ च्या कलम १४ अन्वये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर सदस्य नियुक्ती करण्याकरिता तरतुदी विहित करण्यात आलेल्या आहेत. सद्य:स्थितीत महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर एकूण १० सदस्य कार्यरत असून या सदस्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे -

. क्र .

संबंधित अधिसूचनेचा क्रमांक

नियुक्ती करण्यात आलेल्या सदस्यांचे नाव

निर्वाचक गण

वक्फ अधिनियम , १९९५

मधील कलम

अविविक्र.वक्फ-०६/०८/प्र.क्र.३९/

भाग-३/का-४,
दि.१९/१०/ २०११

१) श्री.आसिफ शौकत कुरेशी

राज्य बार कौन्सिलचे मुस्लिम सदस्य

कलम ९ व

कलम १४(१)(ब)(तीन)

अ.वि.वि.,क्र.वक्फ २०१०/प्र.क्र. १७७/

का-४, दि.२६..२०१२

१) श्री.जैनुद्दीन मोहसीन भाई जव्हेरी,

वि.प.स.

राज्य विधानमंडळाचे मुस्लिम सदस्य

कलम ९ व

कलम १४(१)(ब)(दोन)

अ.वि.वि.क्र.वक्फ २०१२/प्र.क्र.१९०/

का-४, दि.१६.०१.२०१३

१) श्रीमती अैनुल चांद अत्तार,

सह सचिव, अ.वि.वि.

उपसचिव पदापेक्षा कमी नाही असे पद धारण करणारा राज्य शासनाचा अधिकारी

कलम ९ व

कलम १४(१)(इ)

अ.वि.विक्र.वक्फ २०१२/प्र.क्र.१९२/

कार्यासन-४,
दि.३०.. २०१३

१) मा.आ.श्री.दुरानी अब्दुल्ला खान

अ. लतीफखान उर्फ बाबाजानी

राज्य विधान मंडळाचे मुस्लिम सदस्य

कलम ९ व

कलम १४(१)(ब)(दोन)

२) श्री.हबीब फकीह

रु.१ लाख किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या वक्फ संस्थांचे मुतवल्ली

कलम ९ व

कलम १४(१)(ब)(चार)

३) सय्यद जमील अहमद जानी मियॉ

अ.वि.वि.क्र.वक्फ २०१२/प्र.क्र.१९३/

कार्यासन-४,
दि.१०.. २०१४

१) श्री.महेमूद महेबूब शेख,

औरंगाबाद

नगर रचना किंवा व्यवसाय व्यवस्थापन, सामाजिक कार्य, वित्तीय किंवा महसूल, कृषि आणि विकास कार्य या मध्ये व्यवसायिक अनुभव असलेली व्यक्ती.

कलम १४(१)(क);

नामनिर्देशनाने १

२) श्री.मौलाना गुलाम वस्तान्वी (सुन्नी)

शिया व सुन्नी इस्लामी ईश्वरशास्त्रातील प्रत्येकी एक, मान्यता प्राप्त विद्याव्यासंगी

कलम १४(१)(ड);

नामनिर्देशनाने २

३) श्री.मौलाना झहीर अब्बास रिझवी

(शिया)

अ.वि.वि क्र.वक्फ २०१२/प्र.क्र.१९३/

कार्यासन-४,
दि . २५.०४. २०१५

१) श्री.हुसेन दलवाई

संसदेचे राज्यातील मुस्लिम सदस्य

कलम १४(१)(ब)(एक); निवडणूक प्रक्रियेने १ वा २

१.२ महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी रु.१५ कोटी अनुदान देण्याचे शासनाने मान्य केले असून त्यानुसार सन २०११-१२ या आर्थिक वर्षात रु.३ कोटी ८६ लाख इतका निधी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाला उपलब्ध करुन देण्यात आलेला असून सन २०१२-१३ व सन २०१३-१४ या आर्थिक वर्षांत या प्रयोजनासाठी प्रत्येकी रु.३ कोटी ची अर्थसंकल्पिय तरतूद करण्यात आली होती. तथापि, आधी वितरीत करण्यात आलेला निधी अद्याप खर्च न झाल्याने सदर रु.३ कोटी ची रक्कम समर्पित करण्यात आलेली आहे. चालु आर्थिक वर्षात (सन २०१५-१६) या उद्दिष्टाकरिता रु.१.४० कोटी इतकी अर्थसंकल्पिय तरतूद करण्यांत आलेली आहे.

१.३ सन्माननीय मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या दि.21/09/2011 च्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद ची स्थापना करण्याविषयीची दि.04/01/2002 ची अधिसूचना तसेच महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद ची दि.13/11/2003 च्या अधिसूचनेअन्वये प्रसिध्द करण्यात आलेली महाराष्ट्र राज्यातील वक्फांची यादी रद्द (Set-aside) केली आहे. सन्माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या सदर दि.21/09/2011 च्या आदेशाविरुध्द शासनाच्या व वक्फ मंडळाच्या वतीने सन्माननीय सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्र.३२१२९-३२१३१ दाखल करण्यात आलेल्या असून मा.सर्वोच्च न्यायालयाने मा.मुंबई उच्च न्यायालयाने स्वत:च्या आदेशास दि.21/9/2011 रोजी दिलेली स्थगिती कायम केली आहे. सद्य:स्थितीत प्रकरण मा.सर्वोच्च न्यायालयापुढे न्यायप्रविष्ट आहे.

१.४ मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद :
मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद या पदावर श्रीमती नसीमबानू नझीर पटेल(अतिरिक्त कार्यभार), जिल्हा अधिक्षक, भूमी अभिलेख, औरंगाबाद या दि.2.9.2015 पासून कार्यरत आहेत. त्यांचा कार्यालयीन पत्ता खालीलप्रमाणे आहे.

पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद. पनचक्की, औरंगाबाद.

दुरध्वनी क्र. : (0240) 2402366/ 240 1584

ईमेल : ceowakf123@gmail.com

संकेतस्थळ : www.mahawakf.com