मेरीट कम मिन्स शिष्यवृत्ती

सदर योजना अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार द्वारे पुरस्कृत असून राज्यामध्ये ती उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय यांचेमार्फत राबविण्यात येते. या योजनेंतर्गत तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. सदर योजनेंतर्गत पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक असून विद्यार्थ्यांनी मागील वर्षात ५०% पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे

सदर शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. संकेत स्थळासाठी इथे क्लिक करावे

राष्ट्रीय शिष्यवृत्ती संकेत स्थळासाठी इथे क्लिक करावे