महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विकास विभाग
भारत सरकार

पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती

सदर योजना अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार व्दारे पुरस्कृत असून,राज्यामध्ये ती उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे यांचेमार्फत राबविण्यात येते. सदर योजनेंतर्गत इ. ११ वी, १२ वी किंवा समकक्ष अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. सदर योजनेंतर्गत पात्र ठरण्यासाठी विदयार्थ्यांच्या पालकांचे वार्षिंक उत्पन्न रु. 2.00 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक असून विदयार्थ्यांने मागील वर्षात 50% पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.

सदर शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.संकेत स्थळासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा