वित्त मंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील मुद्दे

अ.क्र. आर्थिक वर्ष मा. मंत्री (वित्त) मुद्दा क्र. मुद्द्याचा तपशील
1 2 3 4 5
1.

2012-13

मा. श्री. अजित पवार

70

अल्पसंख्याक विद्यार्थिनींकरिता सायकल वाटप,मदरसा आधुनिकीकरण,अल्पसंख्याक सकेंद्रित ग्रामीण भागाचा विकास व बेरोजगार अल्पसंख्याक युवक-युवतींकरिता रोजगार व स्वयंरोजगार या योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे व त्यासाठी आवश्यक नियतव्यय उपलब्ध केला जाईल.

2.

2013-14

मा. श्री. अजित पवार

65

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी व युवकांना प्रगतीच्या व्यापक संधी उपलब्ध करुन देण्यास शासन प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने उच्च शिक्षणासाठी शष्यवृत्ती योजना,मुलींसाठी वसतीगृहांची सुविधा,शासकीय,निमशासकीय बॅकिंग क्षेत्रातील नोकरीविषयक संधीकरिता भरतीपूर्व प्रशिक्षण व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण अशा विविध योजनांची अमलबजावणी करण्यात येत आहे. सन 2013-14 करिता यासाठी 280 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.

66

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अधिकृत भागभांडवल 250 कोटी असून ते 500 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचे ठरविले आहे.

3.

2014-15

मा. श्री. अजित पवार

39

अल्पसंख्याक बहुल क्षेत्र विकास योजना,अल्पसंख्याक शाळा,मदरासांना पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे ,शिष्यवृत्या त्याचप्रमाणे अल्पसंख्याक उमेदवारांना शासकीय सेवा, बॅकींग यामध्ये नोकरीच्या संधी प्राप्त होण्यासाठी मोफ़त प्रशिक्षण यासारख्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. सन 2014-15 या आर्थिक वर्षात 362 कोटी रुपये इतका नियतव्यय उलब्ध करुन देण्यात येत आहे.

4.

2015-16

मा. श्री. सुधीर मुनगट्टीवार

75

मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळाला भागभांडवली अंशदानापोटी गतवर्षीच्या 35 कोटी रुयांच्या तुलनेत सन 2015-16 साठी 75 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तवित आहे. याव्यतिरिक्त नियोजन विभागांतर्गत अवितरित नियतव्ययापैकी 75 कोटी रुपये नियतव्यय चिन्हांकित केला आहे. या माध्यमातून विशेषतः मुलींच्या रोजगार, स्वयंरोजगार व रोजगारक्षम प्रशिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल.

5.

2015-16

मा. श्री. सुधीर मुनगट्टीवार

76

राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देऊन तेथे वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्याक लोकसमूहातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे या उद्दीष्टासाठी ग्रामीण क्षेत्र विकास योजना कार्यान्वयित आहे. यासाठी सन 2015-16 करिता 25 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. या सोबतच भिवंडी, मालेगाव व मिरज या शहरी भागातही ही योजना सुरु करण्याचा शासनाचा मानस आहे.

6.

2016-17

मा. श्री. सुधीर मुनगट्टीवार

91

राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी केंद्र व राज्य योजना मिळून एकूण 405 कोटी रुयांचा नियतव्यय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ,तरुणांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण व अल्पसंख्याक बहुल भागात पायाभूत सुविधा निर्मिती सारखे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत

7.

2017-18

मा. श्री. सुधीर मुनगट्टीवार

84

84. राज्यातील अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणा-या राज्यस्तरीय विविध योजनांसाठी सन 2017-18 मध्ये 332 कोटी रुपये इतका निधी प्रस्तावित आहे.

8.

2017-18

मा. श्री. सुधीर मुनगट्टीवार

85

85. राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी व ग्रामीण क्षेत्रात मूलभूत /पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देऊन अल्पसंख्याक लोकसमुहातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचविण्यासाठी सन 2017-18 या वर्षात नागरी व ग्रामीण क्षेत्रासाठी 125 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

9.

2017-18

मा. श्री. सुधीर मुनगट्टीवार

86

86. राज्यातील अल्पसंख्याक लोकसमुहातील उमेदवारांना शासकीय व निमशासकीय सेवेत रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध होण्यासाठी केंद्रीय लोकसेवा /महाराष्ट्र लोकसेवा आयोग/बॅकींग सेवा इत्यादी स्पर्धा परिक्षांसाठी प्रशिक्षण तसेच व्यावसायिक अभ्याक्रमामधील प्रवेशाकरिता घेण्यात येणा-या सामायिक प्रवेश परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी प्रशिक्षण देण्याकरिता विशेष शिकवणी वर्ग सुरु करण्यात आले आहेत. सन 2017-18 या वर्षात याकरिता 8 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

10.

2019-20

मा. श्री. अजित पवार

37

अल्पसंख्याक विकास विभागामार्फ़त राज्यातील अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणा-या विविध योजनांसाठी सन 2019-20 या वर्षात एकूण रु.465 कोटी इतका नियतव्यय प्रतावित आहे.

11.

2020-21

मा. श्री. अजित पवार

102

अल्पसंख्याकांच्या विकासासाठी मौलाना आझाद मोफ़त शिकवणी व अन्य योजना, डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना, ग्रामीण क्षेत्र विकास योजना, महाराष्ट्र राज्य वक्फ़ मंडळाला सहाय्यक अनुदान,राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना, राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील युवकांसाठी क्रीडा विषयक योजना, अल्पसंख्याक समाय़ातील उच्च शिक्षण घेणाया मुलींच्या वसतीगृहांमध्ये भोजनाची सुविधा,पोलीस शिपाई भरतीपूर्व निवासी प्रशिक्षण प्रशिक्षण वर्ग योजना,प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम इत्यादी उपक्रम राबविण्यासाठी अल्पसंख्याक विकास विभागास सन 2020-21 याआर्थिक वर्षामध्ये रुपये 550 कोटी नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे.

12.

2020-21

मा. श्री. अजित पवार

103

हज यात्रेकरुंच्या सुविधेसाठी ठाणे जिल्ह्यात मुंब्रा कळवा येथे हज हाऊसचे बांधकाम करणे प्रस्तावित आहे.

13.

2020-21

मा. श्री. अजित पवार

104

अनुसुचित जाती,अनुसुचित जमाती,इतर मागासवर्ग व विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांच्या धर्तीवर अल्पसंख्याक समाजातील आर्थिक दुर्बळ विद्यार्थ्यांना पदविका, पदवी, पदव्युत्तर व पी.एच.डी. अभ्यासक्रमाकरीता परदेशी शिक्षणासाठी नवीन शिष्यवृत्ती योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या बाबीकरिता सन 2020-21 या वर्षात रुपये 120 कोटी नियतव्यय प्रस्तावित आहे.प्रत्यक्षात गोरगरीबांच्या मुला-मुलींनाही मदत मिळेल याची खबरदारी आम्ही घेऊ.

14.

2021-22

मा. श्री. अजित पवार

111

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फ़त अल्पसंख्याक घटकांच्या विविध योजना राबविण्यात येतात. या महामंडळाच्या अधिकृत भागभांडवलामध्ये 200 कोटी रुये इतकी वाढ करण्यात येईल.