शासन आदेश, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक क्र.-२००५ / ८९ / प्र.क्र.१९ / २००५ / ३५ , दि.०९.१०.२००६ अन्वये अल्पसंख्याक घोषित करण्यात आलेले "मुस्लिम", "ख्रिश्चन", "जैन", "पारशी", "बौद्ध" व "शिख" हे ६ आणि शासन अधिसूचना विकास विभाग, क्रमांक : विकाक २०१५ / प्र.क्र.१७७ /का-९ , दि.०२ .०७ .२०१६ अन्वये अल्पसंख्याक घोषित करण्यात आलेला "ज्यु" हे धार्मिक समूह, महाराष्ट्र राज्यात धार्मिक समूह गणण्यात येतात. याशिवाय महाराष्ट्र राज्यातील ज्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेच्या विश्वस्त / सदस्य / बोर्ड मेंबर यांची मातृभाषा मराठीव्यतिरिक्त इतर कोणतीही भारतीय भाषा असेल असा भाषिक समूह हा भाषिक अल्पसंख्याक समूह गणण्यात येतो.