उद्देश:
राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवं वित्त निगम, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत सुक्ष्म पतपुरवठा योजना राबविण्यात येते. महिला आर्थिक विकास महामंडळ, राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान (National Urban Livelihood Mission ( NULM) तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ( Maharashtra State Rural Livelihood Mission (MSRLM) या नामांकित संस्थामार्फत अल्पसंख्याक महिला बचत गटांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी कर्ज स्वरुपात निधी उपलब्ध करुन देणे, हा उद्देश आहे.
- कर्ज योजनेचे स्वरुप : महिला आर्थिक विकास महामंडळ, राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान(National Urban Livelihood Mission (NULM) तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ( Maharashtra State Rural Livelihood Mission (MSRLM) या नामांकित संस्थामार्फत अल्पसंख्याक महिलांसाठी स्वयं सहाय्यता बचत गटांची यापूर्वी स्थापना झाले ली असेल किंवा पुढे होईल त्याप्रमाणे महिला आर्थिक विकास महामंडळाने/इतर नामांकित संस्थांनी त्या बचत गटांना पहिल्या व दुसऱ्या टप्प्यासाठी कर्जाकरिता बँकांशी जोडणी करुन दिलेली असेल व पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या कर्जाची परतफेड ज्या बचत गटांनी यापूर्वी केलेली असेल तो बचत गट मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत तिसऱ्या टप्प्याच्या रु. 2.00 लाख (महामंडळाचा हिस्सा रु. 1.90 लाख व कर्जदार महिला बचत गटाचा हिस्सा रु. 10 हजार) कर्ज देण्यासाठी पात्र राहील.
- कर्ज मर्यादा : रु. 2.00 लाख (महामंडळाचा हिस्सा रु. 1.90 लाख व कर्जदार महिला बचत गटाचा हिस्सा रु. 10 हजार) कर्ज प्रती स्वयंसहाय्यता बचत गट.
- व्याजदर : द.सा.द.शे. 7%
- कर्ज मिळण्यास पात्रता : महिला आर्थिक विकास महामंडळासह इतर नामांकित
- महिला बचत गट : महिला बचत गट केवळ या महामंडळाकडून कर्ज मिळण्यास पात्र राहतील.
- कर्ज परतफेड कालावधी : कर्ज वितरणानंतर पुढील 3 महिन्यापासून पुढील 3 वर्ष कालावधीच्या आत.
- महिला बचत गटांचा सहभाग : 95% कर्ज, 5% महिला बचत गटाचा हिस्सा.
- महिला बचत गटातील सभासद संख्या: कमीत कमी 10 व जास्तीत जास्त 20 सभासद.
- कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा: शहरी भागासाठी - रु. 1,20,000/- पेक्षा कमी
ग्रामीण भागासाठी - रु. 98,000/- पेक्षा कमी
- अल्पसंख्याक सहभाग : महिला बचत गटातील 70% पेक्षा अधिक सभासद अल्पसंख्याक समाजातील असणे आवश्यक.