- विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक साक्षांकित कागदपत्रांच्या दोन प्रती.
- अल्पसंख्याक असल्याचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र)
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा:
(आधार कार्ड/इलेक्शन कार्ड/पारपत्रक ( Passport)/ बँकेचे पासबुक / वाहन चालक परवाना / दूरध्वनी देयक / विद्युत देयक किंवा तलाठी / तहसिलदार यांनी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक)
- ओळखपत्र: अर्जदार व जामिनदार दोन्हीचे (आधार कार्ड/इलेक्शन कार्ड/पारपत्रक ( Passport)/ बँकेचे पासबुक / वाहन चालक परवाना / पॅन कार्ड यापैकी कोणतेही एक)
- उत्पन्न प्रमाणपत्र: कुटुंब प्रमुखाच्या नावे तहसिलदार यांनी निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला/शासकीय व खाजगी क्षेत्रातील कर्मचारी असल्यास फॉर्म नं. 16.
- विहित नमुन्यातील अर्जदार व जामिनदाराचे हमीपत्र.
- बेबाकी प्रमाणपत्र: महामंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचे/वित्तीय संस्थेचे कोणत्याही प्रकारचे कर्ज/थकबाकी नसल्याचे बेबाकी प्रमाणपत्र व इतर कोणत्याही बँकेचे/वित्तीय संस्थेचे कर्ज नसल्याबाबतचे मुळ प्रतीतील शपथपत्र.
- जामिनदार : सक्षम जामिनदार (सार्वजनिक उपक्रम/शासकीय/बँक किंवा खाजगी क्षेत्रातील आयकर भरणार व्यक्ती) किंवा स्थावर (Immovable) मालमत्ता असल्यास गहाण (Mortgage) अथवा जंगम (Movable) मालमत्ता असल्यास तारणगहाण (Hypothecate) करुन घेणे. (मालमत्ता मुल्यांकन पत्र, मालमत्तेची माहिती - 7/12 चा उतारा, 8-अ चा उतारा)
- शैक्षणिक संस्थेचे शुल्कपत्रक (फी स्ट्रक्चर), वसतिगृह / घरमालकाचे भाडेपत्रक व खानावळ (मेस) चे दरपत्रक.
नोट:- दारिद्र्य रेषेखालील उमेदवारांनी दारिद्र्य रेषेखाली असल्याबाबतचे प्राधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडावे.