संपर्क अल्पसंख्याक विकास विभाग भारत सरकार

प्री - मॅट्रिक शिष्यवृत्ती

प्री - मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना ही अल्पसंख्याक कार्य मंत्रालय, भारत सरकारद्वारे पुरस्कृत योजना आहे. सदर योजना राज्यात शालेय शिक्षण विभागातंर्गत संचालक, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येते. या योजनेंतर्गत शासकीय वा खाजगी शाळेत इ. १ ली ते १० वी मध्ये शिकत असलेल्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. सदर योजनेंतर्गत पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. १.०० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक असून, मागील वर्षात विद्यार्थ्यांनी ५०% पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.

सदर शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.संकेत स्थळासाठी इथे क्लिक करावे