प्रस्तावासोबत खालील कागदपत्रे जोडण्यात यावीत-
१) शासन निर्णयासोबतचे प्रपत्र-अ त्यामध्ये या योजनेंतर्गत घेण्यात येणारी विकासकामे, अंदाजपत्रक, विकासकाम पुर्ण होण्यास लागणारा कालावधी तसेच संबंधीत महानगरपालिका/नगरपालिका/ नगरपंचायत यामधील एकूण लोकसंख्या व अल्पसंख्यांक समुहाची लोकसंख्या याची माहिती देण्यात यावी.
२) विकास काम हाती घेण्यास संबंधित महानगरपालिका/नगरपालिका/नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेने मंजूरी दिलेल्या ठरावाची प्रत.
३) हाती घ्यावयाच्या विकासकामाचे सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा महानगरपालिका/नगरपालिका/नगरपरिषद यांच्या अभियंत्याने मान्यता प्रदान केलेले अंदाजपत्रक
४) यापूर्वी या योजनेंतर्गत महानगरपालिका/नगरपालिका/नगरपरिषद यांना अनुदान मंजूर करण्यात आले असल्यास त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र अथवा हाती घेण्यात आलेल्या विकासकामाचा प्रगती अहवाल.