जागतिकीकरणामुळे औद्योगिकीकरणात होत असलेली वाढ व त्यासाठी भविष्यात आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ याचा विचार करता व्यवसाय प्रशिक्षणाची प्रवेशक्षमता व प्रशिक्षण सुविधा वाढविणे आवश्यक झाले आहे. यादृष्टीने कुशल मुनष्यबळाची निर्मिती करणे व अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना या प्रशिक्षणाच्या व रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे याकरिता शासकीय तंत्रनिकेतनामध्ये दुसरी पाळी सुरु करण्यात आली आहे.
एकूण 14 शासकीय तंत्रनिकेतनामध्ये दुसरी पाळी उपलब्ध असून शासकीय तंत्रनिकेतनातील नियमित व्यवसाय अभ्यासक्रमांपैकी काही निवडक व्यवसाय अभ्यासक्रम दुसऱ्या पाळीत शिकविले जातात.
शासकीय तंत्रनिकेतनातील नियमित प्रवेशाकरिता संचालक ( तंत्र शिक्षण ) यांनी विहित केलेल्या नियमानुसार दुसऱ्या पाळीत प्रवेश देण्यात येईल.
दुसऱ्या पाळीमध्ये प्रवेशाकरिता एकूण प्रवेश क्षमतेच्या ७०% जागा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी व ३० % जागा अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवण्यात येतात.
यासाठी शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या दराने शुल्क आकारण्यात येईल.
दुसरी पाळी सुरु असलेले तंत्रनिकेतन व अभ्यासक्रमांची यादीच्या पी.डी.एफ.साठी येथे क्लिक करा
या योजनेअंतर्गत निधी वितरित केलेले सर्व शासन निर्णय राज्य शासनाच्या संकेत स्थळावर जाऊन विभागाचे नाव : अल्पसंख्यांक विकास विभाग व महत्वाचा शब्द : तंत्रनिकेतन असे लिहून पाहू शकता.संकेत स्थळासाठी इथे क्लिक करावे